पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५७)

हिंदुस्थानांतील

प्रमाणें कित्येक प्रांतांवर नामधारी राजे ठेवून त्या प्रांतांचा राज्यकारभार कंपनीनें नेटिव्ह संस्था. आपल्याकडे घेतला होता. कित्येक नेटिव्ह संस्थानिकांबरोबर तिनें तह केले होते. आपल्या पदरीं मोजके सैन्य ठेवणें, परराष्ट्रांशी सल्ला मसलत न करणें, ब्रिटिश सरकारची सल्ला मसलत घेण्या- साठीं ब्रिटिश रेसिदेत आपल्या दरबारी ठेवणे, व कधीं कधीं खंडणी देणें, इत्यादि गोष्टी ह्या तहांत ठर- लेल्या होत्या. हाच कंपनीचा क्रम १८५८नंतर इंग्लिश सरकारानेंहि चालू ठेविला; आणि १८७७त राणीनें “ बादशाहीण" ( एंप्रेस ) अशी पदवी स्वीकारल्यामुळे सर्व नेटिव्ह संस्थानिकांत ती प्रमुख झाली; मग तीं संस्थाने प्रत्यक्ष इंग्लिश सरकारच्या ताब्यांत असोत वा: नसोत.
 नेटिव्ह संस्थानें हल्लीं हिंदुस्थानांत सुमारे १००० असून त्या सर्वांची मिळून हिंदुस्थान सरकारास सालीना सुमारें७२,५०,००० रुपये खंडणी मिळत आहे. तसेंच ह्या सर्व संस्थानिकांचें एकंदर सैन्य २,८१,००० आहे. ह्या सर्व संस्थानांत महत्त्वाचें संस्थान हैदराबादच्या निजा- माचें होय. हैं संस्थान इंग्लिश सरकारास सैन्याची मदत देण्यास नुकतेच इ. स. १८८५त तयार झालें होतें. निजामाच्या राज्यांत १ कोटीवर लोकसंख्या आहे. म्हणजे आयर्लंद व स्कातलंद ह्यांची लोकसंख्या एकत्र