पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३६ )

नेटिव्ह राजांपासून एखादा प्रांत घेऊन आपल्या स्वतः- च्याच नांवानें त्याचा राज्यकारभार तिनें कधींहि चाल - विला नाहीं. तिचें कृत्य विशेष सौम्यपणाचें होतें; नेटिव्ह राजांचे मुख्त्यार अशा नात्यानें ती नेहमी कारभार करी. नेटिव्ह राजांच्या हातांत कवडीचाहि अधिकार नसे; तथापि गादीवर तीं बाहुली असलीच पाहिजेत. हुकूम त्यांच्या नांवानें सुटत, त्यांच्याच सत्तेनें कर गोळा करीत; परंतु खरोखर हुकूम कंपनी करी, व राजाची खाजगी नेमणूक वजा करून बाकीचा सर्व पैसा कंपनीच्या खजिन्यांत जाई. तिनें लवकरच नेटिव्ह राजांची न्यायाची कोहि आपल्या हातांत घेण्यास आरंभ करून न्यायाधीश नेमण्यास सुरुवात केली. हे न्यायाधीश पोलिसांवर देखरेख करीत, व कंपनीचे हुकूम अमलांत आणीत.
 ही राज्यक्रांति बंगाल्यांतील लोकांस प्रथमतः कोणत्याहि प्रकारें हितावह वाटली नाहीं; व तसे होणें साहजिकच होतें. त्यांजवर हे नवीन राज्य करणारे कंपनीच्या राज्यका- रभाराचा परिणाम. म्हटले म्हणजे इंग्लिश व्यापाऱ्यांची कंपनी. हिचा मुख्य उद्देश काय तो पैसा गोळा करण्याचा. आपल्या भांड- वलावर व्याज काय सुटतें, हाच काय तो त्यांचा नेहमींचा मुख्य विचार. शिवाय, जितका पैसा इंग्लंदांत पाठ- वितां येईल तितका पाठविण्यास कंपनींतील भागीदार आपल्या हिंदुस्थानांतील मुखत्यारांस निक्षून हुकूम करीत.