पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५ )

कंपनी बंगाल प्रां- ताचा राज्यकार- भार मिळवते.

 प्रांताच्या एका भागाचें राज्य त्याने कंपनीस प्रथम मिळवून दिलें. बंगाल- उच्या नबाबाचा राज्यकारभार त्याच्या नांवानें आपण करण्याचें पतकरून त्यानें ही गोष्ट केली. त्यानें नवावास प्रत्यक्ष राज्यपदावरून काढिलें नाहीं. आपल्या पदवीचा, आपल्या भव्य राजवाड्यांचा व नवाच ह्या नात्याने मिळत असलेल्या द्रव्याच्या राशींचा उपभोग नबाव घेतच होता; परंतु तो नांवाचा मात्र नवाब राहिला होता; कारण राज्याधि- कार त्याजकडे कांहींच नव्हता. त्याच्या सर्व मुलखाचा राज्यकारभार करण्याचें काम कंपनीकडे आलें होतें. ग्रेट ब्रिटन व आयर्लंद ह्यांचें क्षेत्रफळ ह्या मुलखाच्या सुमारें होईल, इतका हा मुलूख मोठा होता. कंपनीचा अधिकार पक्का करण्यासाठी केव्ह साहेबाने दिल्लीच्या मोगल बादशहास कांहीं द्रव्य देऊन ह्या व्यवस्थेच्या मान्यतेबद्दल त्याजपासून लेखी संमति मिळविली.
 आतां लव्ह साहेबाचा राज्य मिळविण्याचा हा आरं भींचा प्रकार चांगला लक्षांत ठेवण्यासारखा आहे; कारण ह्याच प्रकाराचं अनुकरण करून कंपनीनें पुढें दसरे प्रांत मिळविले. नेटिव्ह राज्यांचा समूळ नाश कंपनीनें कधींच केला नाहीं. कधीं कधीं ती गादीवर नवीन इसमास बसवी; कधीं कधीं हद्दपार झालेल्या राजघरा• ण्यांतील पुरुषास परत आणून गादीवर बसवी; परंतु