पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४ )

राजांच्या अवाढव्य परंतु कवायत न शिकलेल्या फार मोठ्या सैन्यास पुरून उरण्यासारखे आहेत. वांदिवाशची लढाई.
 २ री लढाई वादिवाशची. ही इ. स. १७६०त मद्रासजवळ इंग्लिश व फ्रेंच ह्यांमध्ये झाली. खुद्द क्लैह साहेव ह्या लढाईत नव्हता; परंतु इंग्लिश सैन्यावर सर ऐर कूट ह्या नांवाचा दुसरा एक बडा योद्धा होता. हिंदुस्थानांत आरंभी आरंभी इंग्लिशांच्या ज्या लढाया झाल्या त्यांत कैव्ह साहेबा- च्या खालोखाल पराक्रमी हाच सरदार होता. ह्या लढाईत इंग्लिशांस जय मिळाला; व युरोपियन लोकांची लढ ण्याची पद्धति ह्या लढाईमुळे नेटिव्हांस चांगली समजली, म्हणून इंग्लिश सैन्यांतील नेटिव्ह शिपायांनीं कूट साहेबाचे आभार मानले. ह्या लढाईंतील जय अति महत्त्वाचा होता. इंग्लिश शिपायांपेक्षां फ्रेंच शिपाई चांगले अशी आजपर्यंत नेटिव्ह शिपायांची समजूत होती; परंतु ह्या वादिवाशच्या लढाईमुळे त्यांचें मत बदललें. बंगालच्या नवावाशीं लढून प्लासी येथें मिळालेला जय व फ्रेंचांबरोबर लढून वांदिवाश येथें मिळालेला जय, ह्यांच्या योगानें हिंदुस्थानच्या इतिहासांत फार मोठाले फेरफार झाले; म्हणून ह्या दोन लढाया चांगल्या लक्षांत ठेविल्या पाहिजेत.
 बंगालचा नवाब व फ्रेंच ह्यांचा पराभव करूनच व्ह साहेब स्वस्थ राहिला नाहीं. हिंदुस्थानांतील एका