पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )

 अशा आणीबाणीच्या वेळी इंग्लिश व्यापाऱ्यांच्या सुदैवाने त्यांच्या कारकुनांतच अमानुष सामर्थ्याचा, करी कामांत अति विलक्षण बुद्धीचा, व नेटिव्हांची खोड त्यांच्याच हातून मोडविण्यास समर्थ, असा एक मनुष्य निघाला. हा मनुष्य रावर्ट लैव्ह होय. हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्याचा पाया घालणारा हाच मनुष्य, असें म्हणण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. आपल्या शिपायांची चांगली व्यवस्था करून त्यांचें त्यानें एक छोटेसें युरोपियन पद्धतीचें सैन्य उभारिलें; आणि फ्रेंच व नेटिव्ह ह्यांनी हल्ले केले तेव्हां त्यांची पीछेहाट केली.
  भांडण येथवर येऊन ठेपलें तेव्हां दोन लढाया लक्षांत ठेवण्यासारख्या झाल्या. १ली लढाई प्लासीची; ही इ. स. १७५७ त झाली. ह्या लढाईत खुद व्ह प्लासीची लढाई. साहेवाने १ हजार इंग्लिश शिपाई व ३ हजार नेटिव्ह शिपाई, इतक्या सैन्यानिशी बंगालच्या नवाबाच्या किमानपक्ष २० हजार सैन्याचा अगदी पराभव केला. बंगालच्या नवाबानें फ्रेंचांच्या जोरावर गंगा नदीवरील इंग्लिशांच्या ठिकाणांवर हल्ला करून ती घेतली होती; आणि कंपनीच्या नौकरां- पैकी बहुतेकांस कलकत्त्याच्या प्रसिद्ध अंधार कोठडीमध्ये ( ब्लाक होलमध्ये ) टाकिलें होतें. ह्या प्लासीच्या लढाईवरून असे दिसून आलें कीं, इंग्लिश व त्यांचे कवायत शिकलेले नेटिव्ह शिपाई हे हिंदुस्थानांतील