पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२.)

त्यांस कवायत शिकविली व नेटिव्हांच्या भांडणांत हि पडूं लागले. अर्थात् ते नेहमीं फ्रेंचांच्या उलट बाजूला मिळत. ह्यामुळे फ्रेंचांच्या व इंग्लिशांच्या वसाहतीत साहजिकच उघडपणे लढाई सुरू होई; आणि युरोपांत व अमेरिकेत इंग्लिश व फ्रेंच ह्यांचें युद्ध सुरू होई तेव्हां हिंदुस्थानांतहि त्यांच्यांत युद्ध सुरू होई.
 आज फ्रेंचांचा जय तर उद्यां इंग्लिशांचा जय होई; व ह्यामुळे मद्रास आणि पांदिचेरी हीं वारंवार एकाच्या ताव्यांतून दुसऱ्याच्या ताव्यांत जात येत असत. फ- च लोक स्वतःच इंग्लिशांच्या वसाहतींवर हल्ला करून राहत नसत; तर नेटिव्ह संस्थानिकांसहि तसे करण्या- विषयीं ते भर देत; व अशा रीतीनें दोहोंकडून घेर- ल्यामुळे इंग्लिश व्यापाऱ्यांस जीव की प्राण होत असे. परंतु इंग्लिशांच्या सुदैवानें दुप्लीस त्याच्या स्वतःच्या सरकाराकडून कांहींच मदत मिळाली नाहीं.. त्याच्या बुद्धीची परीक्षा फ्रेंच सरकारास करितां आली नाहीं. जर करितां आली असती तर जर्मनींत ज्या फ्रेंच शिपा- यांची निष्कारण कत्तल होत होती, त्यांपैकीं कांहीं शिपाई फ्रेंच सरकाराने हिंदुस्थानांत दुप्लीच्या मदतीस पाठविले असते; आणि ह्या शिपायांनी जगाचा इतिहास फिरवून टाकिला असता. सरकाराने मदत तर केली स्वदेशी परत बोलाविलें. सारांश, दुम्लीला फ्रेंच नाहींच; परंतु उलट त्यास त्याच्या योग्यतेचा एकहि फ्रेंच सरदार पुढे हिंदुस्थानांत आला नाहीं.