पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१ )

मुसलमान हे आपले देशबांधव आहेत, तेव्हां ह्यांच्याच- बरोबर आपण कसें लढावें, हा विचार त्यांच्या मनांत यावयाचाच नाहीं. अशीच स्थिति हिंदूंचीहि होती. तसें- च आपल्या धन्याचें निमक एकवार चाखिलें म्हणजे मरे- पर्यंत विश्वासुकपणानें त्याची चाकरी करणें, हेंच अब्रूचें काम आहे, अशी ह्या नेटिव्ह शिपायांची समजूत असे, वही गोष्ट दुम्लीला माहीत होती. ह्यामुळे नेटिव्ह शिपायांस पगार देऊन व त्यांना युरोपियन अंमलदारां- कडून कवायत शिकवून त्यांचे एक सैन्य दुप्लीने तयार केलें; व ह्या सैन्याच्या जोरावर तो नेटिव्ह संस्थानि- कांच्या भांडणांत पडूं लागला; व हिंदुस्थानांत त्याचें लवकरच इतकें वजन बसलें कीं, हा देश जिंकून घेण्याचा जो विचार त्याच्या मनांत घोळत होता तो सिद्धीस जाण्याची चांगली संधी आली आहे, असें लोकांस वाहूं लागलें.
 जेव्हां फ्रेंचांनी असा प्रकार सुरू केला, तेव्हां इंग्लिशांना त्यांचें अनुकरण करण्यावाचून मार्गच उरला इंग्लिश व फ्रेंच नाहीं. जर आपण असें केलें नाहीं, तर ह्यांची चढाओढ, आपला सर्व व्यापार आपल्या हातून खचित जाईल, व कदाचित् हे फ्रेंच लोक आपणांस हिंदुस्थानांतून अजीबात हकलून देतील, असें त्यांस दिसून आलें. म्हणून केवळ स्वसंरक्षणार्थ त्यांनी फ्रेंचांचा कित्ता वळविला, पगार देऊन शिपाई ठेविले,