पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३० )

नाही; मात्र ते जात्या शूर आहेत, असें दुप्लीला आढळून आलें. ह्या प्रकारच्या कवायतीचें त्यावेळीं हिंदु- स्थानांत नांवहि नव्हतें. म्हणून आपल्या जवळ कवायत शिकलेलें सैन्य असल्यास नेटिव्ह राजांस आपणांस पाहिजे तसे वागवितां येईल, असें त्यास वाटलें. परंतु कवायत शिकलेलें सैन्य आणावें कोठलें, असा प्रश्न उत्पन्न झाला. तेव्हां त्याची ३री कल्पना आली. कवायत शिकून तयार झालेली अशी एखादी मोठी टोळी आपणां- पाशीं हिंदुस्थानांत नाहीं खरी, परंतु कवायत शिकलेले जे कांहीं युरोपियन हवालदार आपल्यापाशीं आहेत, त्यांच्याकडून नेटिव्ह शिपायांस हें कवायतीचें ज्ञान देतां येईल, व युरोपियन कामगारांच्या आधिपत्याखालीं जवळ जवळ युरोपियन लोकांइतकें उपयोगी पडण्या- जोगें त्यांस करितां येईल, असें त्यास दिसून आलें. ह्या ३ कल्पनांमुळे त्याला हिंदुस्थान जिंकण्याची किल्लीच सांपडली, असें म्हणण्यास हरकत नाहीं. नेटिव्ह शिपाई मिळविणे कठीण नव्हतें. युरोपियन लोकांची नौकरी पत- करण्याविषयीं ह्यांना शंका वाटण्याचा संभव नव्हता; कारण स्वदेशाभिमान म्हणून काय पदार्थ आहे, तें ह्यांना माहीतच नव्हतें; आणि एरवाद्या मुसलमानाला, एखाद्या हिंदूवरोबर किंवा दुसऱ्या पंथाच्या मुसलमानाबरोबर लढ- णें व एखाद्या फ्रेंच किंवा इंग्लिश मनुष्याबरोबर लंढणें ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटत असत. हिंदु किंवा