पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )

ही कल्पना प्रथम दुप्ली नांवाच्या फ्रेंच मनुष्याच्या मनांत आली. मद्रासच्या किंचित् दक्षिणेस असलेल्या पांडिचेरी येथील फ्रेंचांच्या वसाहतीचा हा गव्हर्नर होता. ह्याला ईश्वराने मोठी कुशाग्र बुद्धि दिली होती. ह्यानें आपला उद्देश सिद्धीस नेण्यासाठीं ३ कल्पना लढविल्या. त्यावेळी ह्या देशांतील संस्थानिकांत तंटे सुरू होते; व विशेषतः ठिकठिकाणच्या गाद्यांविषयीं अनेक भांडणे सुरू होती. अशा वेळी प्रथम एका पक्षास व नंतर दुसन्या पक्षास अशी मदत करण्यांत जो फायदा होणार, त्यापेक्षां प्रथ- मतःच जो पक्ष जास्त फायदा करून देण्यास तयार असेल त्याला मदत केली असतां अतोनात फायदा होईल, व आपले वर्चस्व अशा रीतीनें दोन्ही पक्षांवर स्थापितां येईल, असे दुम्लीला वाटलें. अशा प्रकारें नेटिव्ह संस्था- नांत ढवळाढवळ करणे ही त्याची १ली कल्पना. परंतु आपली मदत महत्त्वाची व फायद्याची आहे, असें संस्था- निकांस कसें वाटेल, असा प्रश्न उत्पन्न झाला. ह्याचा उलगडा करण्यास त्याने २री कल्पना लढविली.
  ज्या कवायतीच्या ज्ञानामुळे दूंगा करणाऱ्या हत्यारबंद लोकांचीहि दाणादाण करून त्यांना नम्र करितां येतें, ज्या ज्ञानामुळे राष्ट्रास कोणत्याहि प्रकारचे विशेष भय राहत नाहीं, व ज्या ज्ञानामुळे रानटी लोकांची सुधारणा करण्याचें अनेक पटीनें सामर्थ्य आंगीं येतें, असे युरोपियन कवायतीचें ज्ञान नेटिव्ह लोकांस अगदी