Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९ )

तील लोक एकमेकांचा द्वेष करितात, व एकमेकांस तुच्छ मानितात. कुणबी वगैरे हलक्या जातींतील मनुष्य ज्यां- तलें पाणी प्याला आहे, अशा उष्ट्या भांड्यास ब्राह्मण किंवा क्षत्रिय वगैरे उच्च जातींतील एखाद्या मनुष्याचा स्पर्श झाला तर तो आपणास विटाळ झाला असें सम- जतो. मुसलमानांत देखील ह्याप्रमाणें धर्मसंबंधी मोठाले भेद आहेत; आणि जात, भाषा व धर्म हीं तिन्ही ज्या- चीं एकच आहेत, असा हिंदुस्थानांतल्या लोकांचा एक देखील महत्त्वाचा वर्ग सांपडणार नाहीं.
 अशी ही विलक्षण वस्तुस्थिति कशानें घडून आली, असा प्रश्न सहजच उद्भवतो. ह्याचें उत्तरहि स्पष्ट आहे. निरनिराळ्या राष्ट्रांनी ह्या देशावर अनेक वेळां स्वाया करून हा देश जिंकिला, व त्यामुळेच देशाची अशी स्थिति झाली आहे. तसेंच ह्या स्वायांमुळे देशाचें फारच नुकसान झालें आहे. हिंदुस्थानांतील मूळचे लोक, त्यांना ज्यांनी प्रथम जिंकिलें ते लोक, त्यांनाहि पुन्हा दुसन्या लोकांनी येऊन जिंकिलें ते लोक, अशी ही मोठी परंपरा असून हे लोक हिंदुस्थानांत राहत गेल्यामुळे अनेक भाषा, अनेक जाति आणि अनेक धर्म देशांत उप्तन्न होणें साहजिकच आहे. ह्यापुढें दुसरा असा प्रश्न उप्तन्न होतो की, हिंदुस्थाना- वर अनेक स्वाय कां झाल्या ?
 हिमालय पर्वताच्या योगानें हिंदुस्थान देश ज्या देशांपासून निराळा झाला आहे, त्या देशांशी ह्याची