पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८)

व त्यामुळे सर्व देश, लोक भाषा व धर्म ह्यांची निरनि- राळ्या भागांत कमजास्त प्रमाणानें अशी कांहीं गुंतागुंत झाली की, ती सोडवितां म्हणून यावयाचीच नाहीं; असा प्रकार घडला असतां युरोप खंडाची जी स्थिति होईल तिची कल्पना करा, आणि तशीच सांप्रत हिंदुस्थानची स्थिति आहे, असें समजा. हिंदु, मुसलमान, बुद्ध, शिख, ख्रिस्ती, पारशी वगैरे भिन्न जातींचे व धर्मांचे लोक ह्या देशांत एकमेकांशेजारी राहत आहेत. तसेंच सर्व युरोप खंडांत जितक्या प्रकारच्या भाषा चालतात त्यांहून अधिक प्रकारच्या भाषा हिंदुस्थानांतील एकाच रस्त्याने जाणारे येणारे लोक बोलतात, असे दिसून येईल. फ्रेंच व जर्मन ह्या लोकांत जसा अत्यन्त द्वेष आहे, तसा जातिद्वेष हिंदुस्थानांतील भिन्न भिन्न जातींच्या लोकांत आहे; व त्या लोकांच्या हरहमेष गांठी पडत आहेत. हिंदुस्थानांतील रहिवाशांमध्यें अति मोठी संख्या हिंदूंची; पण त्यांच्यांत देखील अनेक जातिभेद आहेत; व ह्या जातिभेदांमुळें कित्येक धंदे पिढीजाद होऊन बसले आहेत. ह्या निरनिराळ्या जातीं  *सन १८९१ तील खानेसुमारीप्रमाणे हिंदुस्थानची एक- दर लोकसंख्या सुमारें २८ ॥ ॥ कोटि असून मुख्य मुख्य जातींची पुढे लिहिल्याप्रमाणें आहे:-हिंदु २० ॥ ॥ कोटि मुसलमान ५ ॥ ॥ कोटि; बुद्ध ७० लक्ष; शिख १९ लक्ष; जैन १४ लक्ष; पारशी ८९ हजार; इस्त्रायल १७ हजार; आणि ख्रिश्चन २२॥॥ लक्ष.