पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २० ).

ह्या देशावर वारंवार तुलना केली असतां हा देश एक स्वाच्या कां झाल्या? उत्कृष्ट बगीचाच आहे, असें म्हण ण्यास हरकत नाहीं. सिंधु व गंगा ह्यांच्या पाण्यामुळे अतिशय सुपीक झालेली मैदानें कोणीकडे, व हिमालय पर्वताच्या उत्तरेस व पश्चिमेस असणारे उंच डोंगरसपा- टीच्या जमिनीचे नापीक प्रदेश कोणीकडे? ह्या दोहों प्रकारच्या प्रदेशांच्या सुपीकपणांत विलक्षण तफावत आहे. म्हणून त्या नापीक प्रदेशांत राहणाऱ्या लोकांचे थव्यांचे थवे हिमालयामधील खिंडीतून, दूध व मध ह्यां- चा प्रवाह ज्यांतून वाहत आहे अशा ह्या हिंदुस्थानांतील फार सुपीक प्रदेशांत येण्याविषयीं हजारों वर्षे उत्कंठित असत, ह्यांत नवल तें काय ? उद्यां रशियाच्या मनांत जर हिंदुस्थानावर स्वारी करावयाचें आलें तर त्यांतहि कांहीं विशेष नाहीं. कारण मध्य एशियेंतील लोकांनी आजपर्यंत ज्या कारणानें अनेक वेळां स्वाऱ्या केल्या, तेच कारण रशियालाहि स्वारी करण्याविषयीं मोह उप्तन्न करण्यास पुरे आहे. असें झालें असतां ज्या अनि- वार मोहामुळे मध्य एशियेंतील डोंगरी लोकांनी हिंदु- स्थानांतील लोकांस लुटून स्वतःस श्रीमंत केलें, त्याच अनिवार मोहाला रशियन लोकहि वश झाले, एवढेच काय तें होईल. तसेच रशियन आले तरी तेहि मध्य एशियें- तील लोक ज्या मार्गाने आले होते त्याच मार्गानें येणार. हिमालय पर्वत हिंदुस्थानाला गांवकुसाप्रमाणें आहे खरा,