Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

लोकांनी, ह्या लोकांना अगदीं मदत इतका नुसता कट केला असता, तरी करावयाची नाही, तेवढ्यानेंच ह्या लो- कांना तेथें राहणें अशक्य झालें असतें. अशी वस्तुस्थिति असतांहि त्यांनीं तें मोठें द्वीपकल्प घेतलें, हें ऐकून तर अधिकच आश्चर्य वाटेल. असा वास्तविक प्रकार असून त्या बेटांतील लोकांना हें पराक्रमाचें कृत्य वाटत नसून ही एक साहजिक रीतीनेंच घडलेली गोष्ट वाटत होती, व म्हणून ह्या द्वीपकल्पासंबंधी प्रकरणांत ते फार थोर्डे मन घालीत असत, हैं ऐकून तर पराकाष्ठेचें आश्चर्य वाटेल.
 तथापि ज्या कांहीं गोष्टी वर सांगितल्या आहेत, त्या अक्षरशः खऱ्या आहेत. ग्रेट ब्रिटन व आयर्लंड हीच ती दोन बेटें; आणि हिंदुस्थान हेंच तें द्वीपकल्प. ब्रिटिश बेटांच्या ११ पट ह्याचें क्षेत्रफळ असून ७ पढ़ लो. सं. आहे. तसेंच, दर दोन हजारी १ शिपाई, ह्याच प्रमाणाने ह्या महाद्वीपांत त्यांनीं सैन्य ठेविलें आहे. हा सर्व प्रकार आश्चर्य वाटण्याजोगा नाहीं काय ? आणि सर्व जगाच्याहि प्राचीन इतिहासांत ज्या स्थितीला साम्य सांपडावयाचें नाहीं, अशा प्रकारची ही स्थिति इंग्लिशांस कशी व कां प्रात्प झाली, ह्याचा विचार करणे इष्ट नाहीं काय?
 प्रथमतः हिंदुस्थानच्या आकाराविषयीं विचार करूं. एशिया खंडाच्या दक्षिण किनाऱ्यावरील एका द्वीपकल्पाला