पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३ ) हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती. प्रकरण पहिलें. इंग्रज लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी ह्या देशाची स्थिति कशी होतो व येथील मुख्यसत्ता त्यांनी कशी मिळविली. Poesoa .... उपोद्घात. लहानशा दोन बेटांतील लोकांनी आपल्या बेटांच्या ११ पट ज्या द्वीपकल्पाचें क्षेत्रफळ, आणि आपल्या बेटांतील लोकसंख्येच्या ७ पट जेथील लोकसंख्या, असे एक मोठे द्वीपकल्प जिंकिलें; व सरासरीने दर २००० लोकसंख्येस १ शिपाई ह्या प्रमाणानें सैन्य ठेवून तें द्वीपकल्प त्यांनी आपल्या ताब्यांत ठेविलें; असे जर कोणी सांगितलें तर त्या लोकांच्या धारिष्टाचें कोणालाहि आश्चर्य वाटणे साहजिक आहे. त्या द्वीपकल्पाची हवा अशी कांहीं चमत्कारिक होती कीं, तद्देशीय लोकांच्या मदतीशिवाय ह्या जिंकणाऱ्या लोकांना तेथें राहतांच आलें नसतें; म्हणून तद्देशीय २