Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५१) वाढतो. [२] त्यांच्या वाढत चाललेल्या लोक समू- हाला राहण्यास त्यांचा उपयोग होतो. [३] वसाह- तींच्या ऐवजी जर तितकी लहान लहान स्वतंत्र संस्था- नच इंग्लिश लोकांची असती, तर जी योग्यता त्यांना जगांत प्राप्त झाली असती, त्यापेक्षा जास्त योग्यता ते व त्यांच्या वसाहती एकत्र असल्यामुळे प्राप्त झाली आहे. आतां अनुक्रमानेंच वरील उपयोगांचा विचार करूं. प्राचीन काळीं लोकांची मुख्यत्वें अशी समजूत होती की, वसाहती ताब्यांत असल्यानें मूळ देशांतील व्यापारा- च्या जिनसांच्या खपाला अधिक जागा होते. व्यापारासंबंधानें जे कायदे मूळ देश ठरवीत, त्यांमुळे म्हणून वसाहतींना मूळ देशांशीं व्यापार करण्याची मात्र मोकळीक त्या काळी असे. हल्ली असा प्रतिबंध इंग्लि शांनी ठेविलेला नाही. म्हणून अशा स्थितींतहि व्यापा- वसाहतींबरोबरच्या विदिश व्यापाराचें महत्त्व, विचार केला पाहिजे: रासंबंधानें त्यांच्यापासून फायदा होत आहे की काय, हें पाहिले पाहिजे. हे लक्षांत येण्यासाठी पुढील प्रश्नांचा - ( १) वसाहतींशी त्यांचा सांप्रत व्यापार किती आहे ? ( २ ) पूर्वी होता त्यापेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे : ( ३ ) तो वाढण्याचा संभव आहे किंवा कमी होण्याचा संभव आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरें ठरविण्यासाठी आंकड्यांचा उपयोग करावा लागेल; व तो जितक्या सुलभ रीतीनें करितां येईल तितक्या सुलभ