Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५०) ठिकाणांमुळे चालू राहतें, तीं हीं लष्करी ठिकाणें ताब्यां- त राखणेंहि फायदेशीर आहेच. आथेन्स व इराण हीं प्राचीन राष्ट्र आपल्या ताब्यांतील देशांपासून प्रत्यक्ष खंडणी घेत असत; आणि खंडणी वगैरे संबंधानें स्पेन व पोर्तुगाल हीं अर्वाचीन राष्ट्रें त्यांचा उपयोग, हल्लींहि आपल्या वसाहतींपासून खंडण्या घेत आहेत; किंवा आपल्या व्यापाराला उत्तेजन येण्यासाठी वसाह- तींना इतर देशांशीं व्यापार करण्याची बंदी करून अप्र- त्यक्ष रीतीनें पैसा गोळा करीत आहेत. सारांश, वसाह तींपासून पैसा गोळा करणे हा त्यांचा प्राचीन काळी उपयोग होता. इंग्लिश लोक ह्या दोन्हीहि तन्हां- नीं त्यांच्यापासून हल्लीं पैसा काढीत नाहीत. तेव्हां ब्रिटिश लोकांना त्यांच्या वसाहतींचे जे उपयोग हल्लीं होत नाहींत ते असे :--- ( १ ) कैदी पाठविण्याकडे त्यांचा उपयोग होत नाहीं; ( २ ) धर्मसंबंधावरून किंवा राजकीय संबं धावरून हद्दपार केलेल्या लोकांना राहण्याकडे त्यांचा उपयोग होत नाहीं; ( ३ ) विरुद्ध लोकांवर अंमल बस- विण्याकडे त्यांचा उपयोग होत नाहीं; आणि ( ४ ) त्यांच्यापासून ते खंडणी घेत नाहीत. तर मग त्यांना त्या वसाहतींचा उपयोग तरी काय आहे ? ह्या वसहतींचे त्यांना उपयोग आहेत ते असे:- - [ १ ] त्यांच्या योगानें ब्रिटिश व्यापार वसाहतींचे हल्लींचे उपयोग. 8