पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४५) लोक त्यांच्या वसाहतींशी निराळ्या रीतीने वागू लागले आहेत, हे ध्यानांत ठेवणें अवश्य आहे. आपल्या मर्जीस येईल त्याप्रमाणेच वसाहतींना वागवावयाचें, ह्या जुन्या तत्वाचा अनुभव त्यांनी फारच थोडा काळ घेतला. उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका व आत्रेलिया येथील त्यांच्या मोठ मोठ्या वसाहतींना स्वतःचा राज्यकारभार चालविण्याचा व स्वतःचें संरक्षण करण्याचा अधिकार आतां त्यांनी दिला आहे. एखाद्या मुलाचे शाळेत जाण्या- चें वथ सरलें म्हणजे त्या त्रासांतून सुटून जगांत स्वतंत्र- तेनें राहण्यास तो फार उतावळा झालेला असतो. तशी उतावळी ब्रिटिश वसाहतींना होण्याची आतां अगढ़ीं भीति राहिली नाहीं; कारण त्या करत्या सवरत्या झाल्या असे समजून तशा प्रकारचेंच वर्तन इंग्लिशांनी सांप्रत त्यांच्यांशी ठेविलें आहे. ह्यावरून असे दिसून येईल कीं, वृक्ष व त्याचें फळ अशा प्रकारचें जुने सादृश्य वसा- हतींना आतां लागू पडत नाहीं; कारण नव्या वसाहती स्थापन करण्यास आतां जागाच उरली नाहीं. त्याच- प्रमाणे लहान मुलांचेंहि सादृश्य आतां लागू पडत नाहीं; कारण ह्या वसाहतींना मुलांप्रमाणे वागविण्याचें आतां इंग्लिशांनीं सोडून दिले आहे. तेव्हां हीं दोन्ही सादृश्यें हल्लीं लागू पडत नाहींत म्हणून सोडून दिलीं पाहिजेत; आणि वसाहतींनीं, एक तर वृक्षाच्या फळाप्रमाणे आपणांपासून च्युत झाले पाहिजे, १३