पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किंवा प्रौढ मुळे केव्हां केव्हां करितात त्या प्रमाणे आप- ला त्याग केला पाहिजे, अशी इच्छा इतःपर इंग्लि- शांना करून उपयोग नाहीं; कारण असे झाले असतां नवीन वसाहती स्थापण्यास त्यांना जागाच नाहीं. येथें अशी एक शंका उत्पन्न होईल कीं, ह्या वसा- हतींमुळे ब्रिटिश राष्ट्राचा विलक्षण विस्तार झाला आहे; तेव्हां हें सर्व गार्डे सुरळीत कसे चालेल? राष्ट्र म्हटले म्हणजे ते फार मोठे असू शकावयाचेंच नाहीं, अशी प्राचीनकाळी समजूत होती; परंतु सांप्रत ह्या समजुतीत फरक झाला. आहे. पहा, रशियाच्या बादशहासारख्या सर्व सत्ताधारी बादशहाच्या अमलाखालींच नव्हे, तर युनाय्तेद स्तेत्स- सारख्या पूर्ण लोकसत्तात्मक राज्यव्यवस्थेखालींहि मोठाली राष्ट्र सांप्रत सुरळीत चालतात असे आपण पाहतों. तेव्हां ब्रिटिश वसाहती त्या लोकांनी ताब्यांत राखि- ल्या पाहिजेत, एवढी गोष्ट सिद्ध झाली. आतां त्यां- पासून त्यांना उपयोग काय आहे, ह्याचा विचार कर ण्यास व त्या ताव्यांत ठेवण्यास काय काय केले पाहि- जे, तें पाहण्यास हरकत नाहीं. इंग्लिशांच्या पूर्वजांना ज्या प्रश्नाचा विचार कराव- वचा होता त्याहून सांप्रत उत्पन्न झालेला प्रश्न फार भिन्न आहे. " वसाहती मिळविण्यासाठी प्राण आणि पैसा ह्यांचा पाहिजे तितका व्यय करणे फायदेशीर आहे किंवा नाहीं?” हा प्रश्न त्यांच्या पूर्वाजांपुढे होता, व ह्या