पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४४) ह सादृश्य अगढ़ीं लागू पडत नाहीं. इंग्लिश लोकांच्या पूर्वजांची त्या काळीं अशी खातरी झाली नव्हती, म्हणून त्यांना हें सादृश्य कदाचित् योग्य वाटले असेल. तेव्हां असे गृहित वेतां येईल कीं, वसाहतींचें जें राज्य इंग्लि शांच्या हातीं हल्लीं आहे, ते त्यांचें शेवटचेंच होय; आणि हें जर का त्यांनी आपल्या हातून गमाविलें, तर तिसरा जार्ज व त्याचे स्नेही ह्यांनी युनायूतेद स्वेत्स गमाविलें, त्या वेळी जसें वसाहतींचें नवें राज्य त्यांना पुन्हां स्थापि तां आलें, तशा प्रकारचें वसाहतींचें नवीन राज्य स्थाप- ण्याची संधी त्यांना सांप्रत मिळावयाची नाहीं. आतां लहान मुलांच्या सादृश्याकडे वळू; आणि त्या सादृश्यानें तरी वसाहतींचा व मूळ देशांचा संबंध अधिक खन्या रीतीनें ध्यानांत येतो कीं काय ते पाहू. प्राचीन काळी एकंदरीत हें सादृश्य वरेंच लागू पडलें असतें, ही गोष्ट निर्विवाद आहे. अगदी अलीकडील काळापर्यंत आपल्या वसाहतींना आपल्याच मर्जीप्रमाणे वागविण्याची सवय मूळ देशांस होती. जसा जसा काळ लोटत गेला, तस तसे ह्या प्रतिबंधाबद्दल वसाहतींना वैषम्य वाटू लागलें; म्हणून मूळ देशांपासून त्यांनीं आप- ला संबंध अजिवात तोडून टाकिला. युनायूतेद स्तेत्स, चिली आणि पेरू ह्यांचा इतिहास अशाच प्रकारचा आहे. अमेरिकेतील स्वातंत्र्याच्या लढाईपासून (युनातेद स्तेत्स इंग्लंदापासून स्वतंत्र झाले तेव्हापासून ) इंग्लिश