पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४३) तात की, वसाहती ह्या लहान मुलांप्रमाणे आहेत. लहा- नपणीं आई मुलांवर देखरेख ठेविते, त्यांचें संरक्षण करिते, आणि त्यांना शिक्षण देऊन चांगल्या मार्गास लाविते. परंतु मुले जसजशी मोठीं होत जातात, तसतशीं ती स्वतःचें संरक्षण करावयास शिकतात; आणि जरी ती परस्परांशी भांडत नसली, तरी देखील कांहीं काळानें त्यांच्या परस्परांमध्यें व आईमध्ये नात्याचा संबंध फारसा राहत नाहीं; राहिलाच तर फारच सूक्ष्म राहतो. आतां मूळ देश व त्यांच्या वसाहती ह्यांजमधील संबंध ध्यानांत आणण्यास वरील दोन सादृश्यांपैकी एकहि प्रस्तुत काळी लागू पडतेंसें वाटत नाहीं. वृक्षाच्या साह- क्यावरून असे दिसतें की, त्याला प्रारंभ जे फळ आलें, तसली फले प्रतिवर्षी उत्पन्न करण्याची शक्ति निदान कांही वर्षे तरी त्या वृक्षाच्या खोडाच्या आंगी आहे; व ह्या प्रतिवर्षी उत्पन्न होणाऱ्या फळांच्या आंगीहि आणखी नवीन फळे उत्पन्न करण्याचें सामर्थ्य आहेच. भूमंडळाच्या पृष्ठभागावर अनेक वसाहती करण्यासारखी जागा जोपर्यंत शिल्लक होती, तोपर्यंत हें सादृश्य फार चांगलें लागू पडलें असतें; परंतु युरोपियन लोकांना वसा- हती करितां येण्यासारखा भूमंडळाचा बहुतेक सर्व पृष्ठ- भाग त्यांनी त्यांच्या वसाहतींनी, किंवा चिनी लोकां- सारख्या लोकांनी व्यापून टाकिला आहे, अशी हल्लीं बांची पक्की खातरी आहे; म्हणून प्रस्तुतच्या स्थितीस