पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४२) त्याजविषयी किंवा त्यांच्या वाढत चाललेल्या लोक समू- हाला राहण्यास त्यांचा जो उपयोग होत आहे त्याज- विषयी सविस्तर हकीगत देणें हा प्रस्तुत पुस्तकाचा विषय नाहीं; म्हणून ह्या वसाहतींपैकी प्रत्येकीचा पृथक् पृथक् विचार न करितां त्यांचा एकदम विचार करूं. ब्रिटिश वसाहती त्या लोकांनी ताब्यांत कां रा- खिल्या पाहिजेत, हा ह्या प्रकरणांतील मुख्य विषय आहे; म्हणून त्याचा आतां विचार करूं. वसाहतींच्या संबंधानें इतर राष्ट्रांचे विचार काय आहेत, ती राष्ट्र वसा- हती ताब्यांत कां राखतात, व त्यांच्या उदाहरणावरून कोणकोणत्या गोष्टी इंग्लिशांनी शिकण्याजोग्या आहेत, इत्यादि गोष्टींचा विचार केला असतां वसाहती ताब्यांत को राखिल्या पाहिजेत, हे चांगले ध्यानांत येईल. वसाहती व सूळचे देश [त्या ज्या देशांतील लोकां- नीं स्थापिल्या ते देश] ह्यांचा संबंध अनेक रीतीनें ध्यानांत आणितां येतो. एखादा वृक्ष चांगल्या सुदृढ स्थितीत असावा; मूळ देशाचा व त्याला फळ यावें;तें पक्क दशेस आल्यावर साहतीशी संबंध. त्या वृक्षापासून गळून पडावें; सुदैवेंकरून तें सुपीक जमि- नीवर पडल्यास त्याचा एक नवाच वृक्ष बनावा, व आणखी नवीन वृक्षांची मालिका उप्तन्न करण्याचें साम- र्थ्य त्याच्याहि आंगीं यावे; अशासारखीच वसाहतींची स्थिति आहे असे कित्येक मानितात. कित्येक असे म्हण