पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४१) वसाहतींचा विस्तार केवढा आहे, व वाढत चाललेल्या ब्रिटिश लोकसमूहाला पुढे हजारों वर्षेपर्यंत त्या वसा- हतींचा राहण्याला व कामधंद्याला केवढा उपयोग होणार आहे, ह्याची थोडी बहुत कल्पना ह्या उदाहरणावरून होईल, असे वाटतें. आंकड्यांसंबंधानें इतकी माहिती पुरे आहे; म्हणून आतां दुसऱ्या विषयाकडे वळं. ब्रिटिश बेटांना ह्या वसाहतीशिवाय पृथ्वीवरील इतर कोणत्याहि देशाशी व्यापार करण्याची मोकळीक नाही, अशी कल्पना करूं. वसाहतीतील उत्पन्न, असे झाले असतां जगांत उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा पुरवठा ह्या वसाहतींपैकी कोण त्या ना कोणत्या तरी वसाहतीकडून त्यांना होईल; क कोणत्याहि प्रकारचा कारागिरीचा पदार्थ तयार करण्याचे मनांत आणिलें तर कोणत्या तरी वसाहतीस तो करिता येईल. पहा, धान्याची लागवड होण्याजोगी किती तरी जमीन कानड्यामध्ये ओसाड आहे; वेस्ट इंडीज बेटांतून साखर, काफी व तंबाखू ह्यांचा पुरवठा होऊ शकेल; आखेलियांतून लोकर व मास ह्यांचा, आसाम व हिंदु- स्थान येथून तांदूळ व चहा ह्यांचा, कानड्यांतून सागाचा आणि न्यू झीलंडमधून कातडी व मास ह्यांचा पुरवठा होऊं शकेल. ह्या वसाहतींपैकी प्रत्येकीपासून ब्रिटिश लोकांना कोणकोणत्या जिनसांचा पुरवठा होण्यासारखा आहे