Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४०) इंग्रज नाहींत. आत्रेलियाची लोकसंख्या ३० लक्ष आहे. सारांश, ब्रिटिश वसाहतींतील एकं- ३ दर लोकसंख्या जवळ जवळ १ कोटि १० लक्ष - म्हणजे इंग्लंद, वेल्स व स्कातलंद ह्यांतील लोकसंख्येच्या पेक्षां -आहे. ही लोकसंख्या आणखी एका दृष्टीनें ध्यानांत आणण्यासारखी आहे, ती अशी:- कानडा व वेस्त इंदीज ह्यांतील वस्ती आयर्लंदपेक्षा जास्त आहे; व आस्त्रेलियाची लोकसंख्या स्कातलंदपेक्षां कांहीं फारशी कमी नाहीं. जास्त- हे लोकसंख्येचे आंकडे मोठाले आहेत; परंतु वसाहती अगढ़ी भरून गेल्या आहेत, असे त्यांवरून · सिद्ध होत नाहीं. अद्यापि वस्ती करण्यास त्यांत पुष्कळ जागा आहे. ग्रेट ब्रिटनाइतकी जर कानड्यांत दाट वस्ती झाली तर तेथें १०० कोटि, म्हणजे इंग्लंद, स्कातलंद व वेल्स ह्यांच्या लोकसंख्येच्या ३० पटीपेक्षा जास्त, लोक राहतील. तेव्हां इंग्लंदची लोकसंख्या दर ३० वर्षांनी दुप्पट ह्या प्रमाणानें ( उदाहरणार्थ, इंग्लंदची लोकसंख्या ठोकळ प्रमाणानें ३ कोटि धरिल्यास पहिल्या ३० वर्षांच्या अखेरीस ६, ६० वर्षांच्या अखेरीस १२, ९० वर्षांच्या अखेरीस २४,१२० वर्षांच्या अखेरीस ४८, व १५० वर्षांच्या अखेरीस ९६ कोटि, ह्या प्रमा- जानें ) वाढत चालली, असें मानिलें तरी देखील सर्व कानडा भरून जाण्यास १५० वर्षे लागतील. ब्रिटिश