पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३९) बरेंच विस्तीर्ण राष्ट्र आहे; तथापि हें राष्ट्र ब्रिटिश राष्ट्राच्या विस्ताराच्या 2 पेक्षां फारच थोडे जास्त आहे. फ्रान्स- युरोपांतील इतर कोणतेंहि राष्ट्र व ब्रिटिश राष्ट्र ह्यांच्या विस्तारांत तर जमीन अस्मानीचा फरक आहे. च्या ताब्यांतील सर्व वसाहती धरून देखील तो देश ब्रिटिश राष्ट्राच्या १६ व्या भागाएवढाच आहे. जर्म- नीच्या ताब्यांत वसाहती मुळींच नाहींत, व तो देश ब्रिटिश राष्ट्राच्या ४० व्या भागाबरोबर आहे. करूं. आतां ह्या विस्ताराचा दुसऱ्या एका दृष्टीने विचार खुद्द ब्रिटिश बेटांच्या क्षेत्रफळाच्या प्रत्येक चौरस मैलास ६५ चौरस मैल वसाहती आहेत; फ्रान्स- च्या पुरत्या २ चौरस मैलहि नाहींत. तेव्हां इंग्लंदा- एवढाली ६५ इंग्लंदें त्यांच्या वसाहतींत मावतील असे झालें. म्हणने खुद्द युरोपांत इंग्लिशांचें एक इंग्लंद असून त्यांची तसलों ६५ इंग्लंदें पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही. विस्तारासंबंधाने इतकें विवेचन पुरे आहे. आतां लोकसंख्येसंबंधानें विचार करूं. कानड्यामध्ये हल्ली ४९ लक्ष लोकसंख्या आहे, व वेस्त इंदीज बेटांतील वसाहतीत १५ लक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेंतील वसाहतींत १७||लक्ष लोक आहेत, व ह्यांपैकी निमे म्हणजे कंबरलंद, दरहाम नार्थबर्लंद व वेस्ट मोरलंद ह्यांत जितके लोक आहेत तितके देखील त्याची लोक संख्या.