पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३१) लढण्यां- जिंकण्याचे त्रेत निष्फळ झाले. त्याची कारणे दोन होतीं:- [१] यांच्या योगानें इंग्लिशांस समुद्रावरील वर्चस्व प्राप्त झाले, ते नेलसन ह्यान मिळविलेले जय, व [ २ ] युरोपांतील इतर राष्ट्रांना पैशाचा पुरवठा करून त्यांना नेपोलियनाबरोबर वारंवार लढण्यास लावून त्याचें बहुतेक सामर्थ्य युरोपांतील इतर राष्ट्रांशी तच खर्च व्हावें, अशी इंग्लंदाने केलेली युक्ति. ह्या युद्धा- मुळे २७,७०,००,००० पौंड कर्ज वाढले, परंतु ह्यामुळेच इंग्लिशांना हिंदुस्थानापर्यंत मजल मारण्याचे सामर्थ्य आले; व फ्रान्सच्या ताब्यांतील घेण्यासारखी जीं थोडीं बहुत ठिकागे होती, ती चेतां आली. त्याचप्रमाणे को गत्याहि प्रकारचा अडथळा न येतं दक्षिण गोलार्वात नवीन वसाहतींचें राज्य स्थापण्याचा आरंभ करण्याचेह सामर्थ्य त्यांना ह्या युद्धामुळेच आलें. टोबागो, संत लूसिया, व आइल् आफ् फ्रान्स [ ह्यालाच मारिशस म्हणतात ] हीं बेटे इंग्लिशांस फ्रेंचांब- रोबरच्या युद्धाच्या ह्या दुसऱ्या भावामुळेच मिळाली. ह्या सर्व बेटांत साखरेचे उत्पन्न मोठे आहे. तसेच केप आफ गुड होप, डेमेरारा, एसेकीबो व बरबाइस ही ठिकाणेंहि ह्याच सुमारास इंग्लिशांनी डच लोकांपासून घेतली. वाच्या लढाईनंतर इंग्लिशांच्या सांप्रतच्या वसा- हतींसंबंधी राज्याची मर्यादा पूर्णपणे ठरली, असे म्हण-