पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३०) कडून त्रिनिदाद बेट इंग्लिशांस मिळालें, व डच लोकांकडून सीलोन मिळालें. युद्ध सुरू असतां माल्टा बेट इंग्लिशांनी घेतलें होतें, व ते॑ तेव्हांपासून त्यांच्याच आहे. युद्धाचा दुसरा भाग १८०४ पासून १८१५ पर्यंत सुरू होता. पहिल्या भागांत इंग्लिशांनीच फ्रेंचां- च्या प्रजासत्ताक राज्यावर स्वारी केली होती; परंतु ह्या दुसऱ्या भागांत नपोलियन इंग्लंदावर स्वारी करण्याच्या विचारांत होता, म्हणून त्या स्वारीपासून देशाचें संरक्षण करणे, इतकेंच इंग्लिशांचें काम होते. युरोपांत इंग्लि- शांच्या ताब्यांत जेवढा प्रदेश होता, तेवढंच काय तें नेपोलियन ह्याच्या- बरावर यु केल्या मुळे मिळालेल्या वसाहती. इंग्लिश राष्ट्र, अर्से नेपोलियन मानीत नसे; तर सर्व पृथ्वीभर त्या राष्ट्राचा जो विस्तार झाला होता, तो ध्यानांत आणून त्याच्या महत्त्वाचा अंदाज तो करीत असे; आणि हिंदुस्थान व इतर इंग्लिश वसाहती ह्यांवर हल्ला करून त्यांची पृथ्वीवर सर्वत्र पसरलेली ही सत्ताच नष्ट करण्याचा त्याचा मुख्य उद्देश होता. " ह्या जुन्या युरोपाचा मला कंटाळा आला आहे," असे तो म्हणे; व राष्ट्रांच्या सत्तेची ह्या पुढं तुलना करावयाची ती युरोपांतील त्यांच्या महत्त्वावरूनच करावयाची नसून सर्व पृथ्वीवर त्यांचें में महत्त्व असेल त्याप्रमाणे करावयाची, अशी त्याची सम- जूत झाली होती, असा त्याच्या ह्या म्हणण्याचा गर्भित हेतु होता. इंग्लिशांच्या सुदैवानें नेपोलियन ह्यांचे इंग्लंद