पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३२) ण्यास कांहीं हरकत नाही. तेव्हापासून त्यांनी ह्या वसाहतींत सर्वत्र इतकी झपाट्यानें वस्ती केली की, त्याचें आश्च- र्यच वाटतें. न्यू सौय वेल्सचं हल्लींचें मुख्य शहर में सिदनी त्यांत प्रथमतः इंग्लिशांनी १७८८ त कांहीं कैदी पाठविले. पश्चिम आस्त्रेलियामध्ये १८२९त प्रथमतः वसाहत स्थापिली. १८३६ त दक्षिण आस्त्रेलिया व त्याचें मुख्य शहर आदिलेट येथें वस्ती केली. पुढे तीन वर्षांनी न्यू झीलंदामध्ये पहिली वसाहत स्थापिली. १८५० त व्हिक्टोरिया ही स्वतंत्र वसाहत केली. भूगो- लाच्या दुसऱ्या बाजूस ज्या ह्या वसाहती त्यांनी स्थापि- ल्या, त्यांशिवाय दुसरीहि कित्येक ठिकाणें त्यांनी आपल्या ताब्यांत घेतली. ह्यांपैकी कित्येकांचा त्यांना लष्करी कामाकडे उपयोग होत असे, व कित्येकांचा व्यापाराकडे होत असे. अशा प्रकारची ठिकाणें पुढे दिल्याप्रमाणे :– सिंगापूर हें १८१९त घेतलें; एडन १८३१त घेतलें; रंगून १८२४त ब्रह्मी लोकांपासून घेतलें; व हांगकांग १८४९त चिनी लोकांपासून घेतले.ह्यांशिवाय कानड्यांतील त्यांच्या वसाहतींचा इतका विस्तार झाला की, पूर्वेच्या बाजूस त्या ब्रिटिश कोलंबियापर्यंत व उत्तरे- च्या बाजूस हडसनच्या उपसागरापर्यंत पसरल्या. इ.स. १८१५ नंतर मिळाले- ल्या वसाहती. इंग्लिशांच्या अमला वाली राहणें डच लोकांस पसंत न वाटल्यामुळे त्यांनी दक्षिण आफ्रिकेत अनुक्रमें i