पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२९) ज्या युद्धांमुळे फ्रान्स देशामध्ये मोठी राज्यक्रांति झाली त्या युद्धांचा [ फ्रेंच रेव्होल्यूशनचा ] काळ ह्यापुढे आला. ह्या युद्धांमुळे जे परिणाम घडले त्यांजबद्दलह गैर समजूत होण्याचा संभव आहे. फ्रान्स देशांतील प्रजासत्ताक लोकांवर वर्क ह्याने कडक टीका केली असे पुष्कळ लोकांचें म्हणणे आहे; परंतु ह्या युद्धांपासून इंग्लि शांस फायदे कोणकोणते झाले, प्रजासत्ताक फ्रेंच राष्ट्राशी युद्ध केल्यामुळे मिळालेल्या वसाहती. इकडे मात्र त्यांचें अवश्य तितकें लक्ष जात नाहीं. फ्रान्स, स्पेन व हालंद ह्या युरोपांतील तीन राष्ट्रांच्याच काय त्या पुष्कळ वसाहती होत्या; व ह्या युद्धामुळे ओळीनेंच ह्या तीन राष्ट्रांशी लढण्याचा इंग्लिशांना प्रसंग आला. ह्या युद्धासंबंधी विशेष महत्त्वा- ची गोष्ट कोणती? युद्ध सुरू होण्यापूर्वी इंग्लिशांच्या वसाहती त्यांच्या हातून गेल्या होत्या; परंतु युद्ध संपले तेव्हा वसाहतींचें एक नवें राज्य त्यांच्या ताब्यांत आलें, व शिवाय एशिया खंडांतहि एक मोठा प्रदेश त्यांच्या ताव्यांत आला हीच महत्त्वाची गोष्ट होय. ह्या युद्धांतील लढायांचे दोन भाग कारतां येतील. + एमिन्स येथे १८०५ मध्यें तह होऊन पहिल्या भागां- तील लढाया संपल्या; व त्यांमुळे २२,६०,००,० पौंड कर्ज वाढले. ह्या तहामुळे स्पेन देशांतील लोकां + एमिन्स हे ठिकाण फ्रान्समध्ये पारिसच्या उत्तरेस ७१ मैलांवर आहे. हा तह इंग्लंद, फ्रान्स, स्पेन व हालंद ह्यांमध्ये झाला. 2