पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२८) दिसतात. युरोप व अमेरिका ह्या दोन्ही खंडांतील अति विद्वान् मुत्सद्द्यांचा म्हणण्याकडे लक्ष न देतां इंग्लिशांनी मूर्खपणानें वसाहतींवर आपले हक्क बजाविण्याचा हेका धरिला व त्याचा असा परिणाम झाला. म्हणून ह्याप्रमाणें सूर्खपणा पुन्हा कधीं करावयाचा नाहीं, हीच महत्त्वाची गोष्ट ह्या इतिहासापासून त्यांना शिकावयाची आहे. ह्या वसाहतींना पुन्हा ताब्यांत आणण्यासाठी इंग्लिशांनी भगीरथ प्रयत्न केले; परंतु वसाहतींना फ्रेंच लोक व स्पेन देशांतील लोक ह्यांची मदत असल्यामुळे इंग्लिशांची खटपट फुकट गेली. इंग्लिशांनी त्या दोघांचेंहि नुकसान केलेच होतें; व त्यामुळे इंटिशांचे उट्टे काढण्यास ते अगदी संवोच पाहत होते; व म्हगनच त्यांनी इंग्लिश वसाहतीतील लोकांस मदत केली. वेस्त इंदीज बेटें देखी- ल इंग्लिशांच्या हातून जावयाचींच; परंतु समुद्रामध्ये राइने येथील लढाईत त्यांना जो एक जय मिळाला, तेवढ्यामुळे हीं बेटे मात्र त्यांच्या हातून गेली नाहींत. ह्या युद्धामुळे १०,००,००,००० पौंड कर्ज वाढलें; व १७८३त हूं युद्ध संपले. तेव्हां त्यांच्या ताव्यांत कानडा व नोवा स्कोशिया, वेस्त इंदीज बेटापैकी त्यांच्या ताब्यांत जीं बेटे होती ती, आफ्रिका खंडाच्या किनाऱ्या- वरील थोड्या बहुत जागा, व जिब्राल्तर इतकी ठिकाणे मात्र त्यांच्या ताब्यांत राहिली. हिंदुस्थानासंबंधी विचार मागे झालाच आहे.