पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११३) देशांचा विशेष स्नेह होता. म्हणून पुढे इंग्लंदाची व रशियाची जी लढाई झाली, त्या लढाईत व दुसऱ्या कित्येक प्रसंगी फ्रेंच लोकांनी इंग्लिशांस साहाय्य केलें. इतिहास वाचीत असतां त्यांतील गोष्टींचे वर दर्शावल्याप्रमाणे ठळक ठळक भाग करितां येतील, तेव्हां तसे ठळक भाग होण्यास कांहीं विशेष कारणेंहि असली पाहिजेत, असे अनुमान सहज होतें. तसेच दोन राष्ट्रांमध्ये बराच काळ लढाया व्हाव्या, पुढे बराच काळ त्यांच्यामध्यें तह व्हावे; अशा ह्या स्थित्यंतरांचें कारण काय, असा प्रश्न साहजिक उद्भवतो. कोणी म्हणतात, " राजे महत्त्वाकांक्षी असतात " हेंच ह्या लढायांचें कारण होय; पण हें उत्तर समर्पक दिसत नाहीं. कारण राष्ट्रांना राजे सर्वकाळ असतातच; व केव्हां केव्हां त्यांच्या ठिकाणी महत्त्वाकांक्षा असते व केव्हां केव्हां नसते, अर्सेहि म्हणणें सयुक्तिक दिसणार नाहीं. दुसरी एक गोष्ट ह्या संबंधानें सांगण्यासारखी आहे. राजांची महत्त्वाकांक्षा हेच जर लढायांचें नुसते कारण असेल. तर ज्या काळी इंग्लंदांत राजांच्याच हाती विशेष सत्ता होती, त्या काळी लढायाहि विशेष होणे योग्य होतें. आतां टयूडर घराणें व स्टयूअर्ट घराणे ह्यांतील राजे राज्य करीत असतां राजांची सत्ता मोठी होती; तरी देखील त्या काळांत शांतता होती. उलट पक्षीं तिसरा एडवर्ड व पांचवा हेन्री, तसेच पहिला