पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११४) जार्ज व दुसरा जार्ज ह्यांच्या कारकीर्दीत राजांची सत्ता कमी असून पार्लमेंटाची सत्ता फार मोठी होती; इतकी मोठी होती कीं, लढाईस लागणारा पैसा जर पार्लमेंटाने • मंजूर केला नाहीं, तर राजांना क्षणभरहि लढाई करितां येत नव्हती. असे असतांहि त्या काळांत लढाया होत होत्या. तेव्हां राजांची महत्त्वाकांक्षा हेंच लढायांचें कारण ह्या म्हणण्यांची सत्यता कोठें राहिली ? आतां अशा प्रकारें केव्हां केव्हां लढाया होण्याचें व केव्हां केव्हां शांतता असण्याचें वास्तविक कारण काय ह्याचा विचार करूं. केसी व आजिंकूर येथील लढायांच्या वेळी पार्लमेंटानें त्या लढायांसाठी खुषीने पैसा मंजूर केला; कारण त्या लढायांमुळे कांहीं फायदे होतील, असे त्यांस वाटत होतें. ते फायदे असेः- ( १ ) इंग्लंदचा राजा हाच जर फ्रान्सचा राजा झाला तर आपणांवरील कराचे ओझे हलकें होईल; ( २ ) त्या वेळी इंग्लंदांतील लोकरीचे जिन्नस सर्वांत बेलजम देशा- • मध्ये फार खपत होते, व फ्रेंच लोक तो देश जिंकून वेतील असा संभव त्या वेळी दिसत होता; आणि ( ३ ) क्याले व गिनी [ ह्या प्रांताचें मुख्य शहर बोडी ] हे प्रांत आपल्या ताब्यांत ठेवणें फार महत्त्वाचे आहे असे पार्लमेंटास वाटत होतें; कारण त्या ठिकाणी इंग्लंदांतील लोकरीचे जिन्नस पाठविल्याने त्यांच्या मोबदला तेथून इंग्लिशांस दारूचा पुरवठा होणार होता. सारांश, हे ३ --