पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११२) मीति नाहींशी झाल्यामुळे त्यांहूनाह प्रबळ शत्रु जे फ्रेंच त्यांजकडे लक्ष देण्यास इंग्रजांना अवकाश मिळाला. फ्रेंच लोकांबरोबर वसा- हतींच्या संबंधानें युद्धे. इंग्लिशांचा फ्रेंचांशी निरनिराळ्या काळी कोण कोणत्या प्रकारचा संबंध होता, ह्याचा विचा- र करूं लागलों असतां त्या काळाचे ४ भाग होतात. १४व्या व १५व्या शतकांत साधारणपणे पाहिले असतां, ह्या दोन राष्ट्रांच्या लढाया सुरू होत्या. क्रेती व पाइ- टियर्स येथील लढाया. तसेंच आजिंकूर येथील लढाई व जोन आफ आर्क हिची हकीगत, इत्यादि गोष्टी वरील काळांत घडलेल्या आहेत; व हाच पहिला भाग होय. पुढे १६व्या व १७व्या शतकांत सामान्यतः इंग्लिशां- चें व त्यांचें सख्य होतें. मेरी राणीच्या कारकीर्दीत इंग्लिशांपासून फ्रेंचांनी क्याले (फ्रान्सच्या उत्तर किना- ज्यावरील एक ) शहर परत घेतलें. तेव्हापासून ( १९९८ पालन ) तिसरा विल्यम ह्याच्या कारकीर्दी- तील लढायांपर्यंत इंग्लिश व फ्रेंच ह्यांच्यामध्ये महत्त्वाची अशी एकाहे लढाई झाली नाही, असे म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. हा दुसरा भाग होय. नंतर तिसन्या भागास सुरवात झाली. ह्या काळांत, तिसरा विल्यम गादीवर बसल्यापासून १८१५तील वाटर्लच्या लढाई- पर्यंत ह्या उभयतांत अनेक लढाया झाल्या; मधून मधून मात्र कांही वेळ शांतता असे. नंतर चौथा भाग आला. ह्या काळांत शांतता होती; व फ्रान्स आणि इंग्लंद ह्या