पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०९) इतर राष्ट्रांनी स्थापिलेल्या नवीन वसाहती जिंकण्यासाठी •लढण्याची सुरवात केली. बरीच वर्षे इंग्लिशांच्या आर- माराचे प्राबल्य वाढत चालले होते; व म्हणून कामवेलानें • स्पेन देशाशी उघडपणे लढाई सुरू केली; आणि जमेका बेटावर आरमार पाठवून तें स्पेन देशांतील लोकांपासून त्याने घेत. तें तेव्हापासून इंग्लिशांच्याच ताब्यांत आहे. युरोपांतील लढायांतून आतांपासून कांहीं विशेष प्रकारचा फेरफार दिसून येऊं लागला. तेव्हांपासून वाळूच्या लढाईत ( १८१५ पर्यंत ) इंग्लिशांनी ज्या ज्या लढाया केल्या, त्या त्या लढायांत त्यांचा मु- ख्य उद्देश म्हटला म्हणजे, आपल्या प्रतिपक्ष्यांच्या वसा- हती घेगें, व त्यांचें ह्याप्रमाणे नुकसान करून आपल्या वसाहतींचा विस्तार वाढविणें, एवढाच मुख्यत्वें करून होता. ह्या प्रकारचें आचरण करण्यात त्यांना नीति- दृष्ट्या अधिकार होता किंवा नाहीं, हा प्रश्न स्वतंत्र आहे; तथापि १८१४ पर्यंत त्यांनी मिळविलेल्या बहुतेक वसा- हती त्यांनी इतर राष्ट्रांपासून हिसकावून घेतल्या आहेत, इतकी गोष्ट निर्विवाद आहे. इतर राष्ट्रांचें नुकसान करून आपल्या वसाहती वाढविण्याचा प्रयत्न इंग्लिशांनी चालविला, तेव्हां त्या प्रयत्नाबरोबरच त्या वसाहतीतील जितका व्यापार आप- या हातीं आणितां येईल तितका आणण्याविषयीह