पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०८) परंतु तिच्यावरील गव्हर्नराची नेमणूक इंग्लंदाहून होत असे; व त्या वसाहतींना इंग्लंदाशी व्यापार करण्याची मात्र मोकळीक असे. उत्तर अमेरिकेतील इंग्लिशांच्या वसाहतींच्या आरंभाचा इतिहास ह्याप्रमाणे झाला. ह्यावरून असें दिसून येईल कीं, क्रामवेल ह्याची सत्ता इंग्लंदांत होती त्यावेळीं, म्हणजे १७व्या शत- कांच्या मध्याच्या सुमारास, अमेरिका खंड स्पेन, पोर्तु- गाल, फ्रान्स, हालुंड व इंग्लंद इतक्या युरोपांतील राष्ट्रांच्या ताब्यांत होतें. ह्यांपैकीं स्पेन व पोर्तुगाल ह्यांचे भाग मोठाले होते. उत्तर अमेरिकेत फ्रान्सच्या लडाई करून मिळविलेल्या वसाहती. ताब्यांत बराच मुलुख होता; व वरील दोन राष्ट्रांच्या खालोखाल फ्रान्साचेच वर्चस्व तेथ होतें. हालंद व इंग्लंद ह्यांच्या ताब्यांत त्या काळी सर्वांत कमी प्रदेश होता. आतां तेव्हां अमेरिका खंडांत हालंदच्या ताब्यांत फारच कमी मुलूख होता हें खरें; परंतु एशिया खंडाच्या आग्नेय किन न्यापासून बऱ्याच अंतरावरील मसाल्यांच्या वेटांत व जावा बेटांत त्यांच्या पुष्कळच वसाहती होत्या. बबूंदा बेटांतील व उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्यावरील इतर लहानसान वसाहती इतक्याच काय त्या इंग्लंदच्या ताब्यांत होत्या. रिकेंतील मूळच्या रहिवाशांच्या ताब्यांतील प्रांत जिंक, ण्यांतच ड्रा वेळपर्यंत वरील युरोप खंडांतील राष्ट्रांची च ढाओढ सुरू होती. परंतु आलिव्हर कामवेल ह्याने अमे-