Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०७) तेथेंहि गुलामांचा व्यापार होता; आणि न्यू इंग्लंद स्टेटम् ही : प्यूरिटन पंथाची असून तेथें गुलामांच्या व्यापा- रास प्रतिबंध होता. आण- ह्या वसाहती अतांतिक महासागराच्या पूर्व किनाऱ्यावर पसरल्या होत्या. न्यू आमस्तीम- जिला हल्लीं न्यूयार्क म्हणतात – ती वसाहत वरील इंग्लिशांच्या वसाहतींच्या मध्यभागीं होती; व ती डच लोकांच्या ताब्यांत होती. तसेंच ह्या वसाहतीच्या दक्षिणेस स्पेन देशांतील लोकांची प्लारिडा ही वसाहत होती. खीहि खालीं दक्षिणेस मिसिसिपी नदीच्या कांठचा प्रदेश; तसेंच उत्तरेस एकेडी प्रांत व सेंट लारेन्स नदीच्या कांठचा प्रदेश हे होते. एकेडी प्रांताला हल्लीं नोवा स्कोशिया म्हणतात; व सेंट लारेन्स नदीच्या कांठच्या प्रदेशाला ह्या ३ वसाहती – मिसिसिपीच्या कांठचा प्रदेश, एकेडी प्रांत व सेंट लारेन्स नदीच्या कांठचा प्रदेश-फ्रेंचांच्या ताव्यांत होत्या, इंग्लिशां- च्या प्रत्येक वसाहतीचें एक एक लहानसें पार्लमेंट होते; कानडा म्हणतात. प्युरिटन – एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत व ते च्यामागून लागलेच जे राजे गादीवर बसले त्यांच्या वेळी एक नवीन धर्मपंथ उत्पन्न झाला. ईश्वराची स्तुति करण्याचा मार्ग अगदी पवित्र ( प्यूअर ) असावा, अशी त्या पंथांतील लोकांची इच्छा असे, म्हणून त्यांना प्यूरिटन म्हणत. १६४० पासून १६६० पर्यंत इंग्लंदाच्या इतिहासाशीं ह्यांचा पुष्कळ संबंध आलेला आहे. हे लोक आपले आयुष्य शांतपणाने व सद्गुणाने राहून घालवितात, अशी त्यांची आख्या आहे.