पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होता, व गुलामांच्या व्यापारास तेथे प्रत्यवाय नव्हता; मेरिलंद ही वसाहत रोमन क्याथलिक पंथाची असून ऑफ इंग्लंड ) हे पद धारण केले. त्याप्रमाणे ज्या धर्मपंथाला राजाश्रय आहे त्याला ' चर्च ऑफ इंग्लंड ' म्हणतात. सहावा एडवर्ड हा प्रोटेस्टंट धर्मपंथानुयायी असून क्रानमर, रिडले व लाटे- मर ह्यांच्या सान्याने त्यानें इंग्लंदांतील धर्माच्या सुधारणेसाठी पुष्कळ खटपट केली. सहावा एडवर्ड यानें धर्मसंबंधी केलेले कायदे चाल ठेवण्याविषयी मेरी राणीनें वचन दिले होते. परंतु ती निः- सीम क्याथलिक मताची पडल्यामुळे गादीवर वसल्याबरोबर धर्म- सुधारणेचा विध्वंस करण्याची सुरवात तिने केली. कामनर, रिडले व लाटिमर त्यांस तिने तुरुंगांत टाकिले; व लवकरच ह्या तिघांस व दुसऱ्याहि पुष्कळांस धर्माच्या पायीं अनिमुखीं पडावें लागले. हिच्या कारकीर्दीतील शेवटच्या तीन वर्षात पुरुष, स्त्रिया व मुले मिळुन सुमारे २८० माणसांस पाखंड मताची म्हणून जाळून टाक ण्यांत आले. नंतर १५५९त प्राटेस्टंट मताची पुन्हा स्थापना होऊन इंग्लंदच्या धर्मपंथास सांप्रतचें स्वरूप आले. १५६२त कानमर त्याने लिहिलेल्या धर्मश्रद्धेच्या ३९ कलमांचा प्रार्थनेच्या पुस्तकांत समावेश करण्यांत आला. एलिझारेथ राणीने असे निक्षून सांगितले की, सदई ३९ कलमांत निर्दिष्ट केल्याप्रमाणे जे • इंग्लंडचें एपिस्कोपल चर्च' [ कायद्याने स्थापन झालेला इंग्लंदा- तलि धर्मपंथ तो हाच ष त्याजवर सर्व प्रकारची देखरेख विशप लोकांची] त्यांतील मतांपासून काडीभरहि अलीकडे पलीकडे पाऊल पडल्यास आपणांस सहन व्हावयाचें नाहीं. असे असतांहि इंग्लं- दांत १६४९त ' प्रेम्बिटेरियन' म्हणून एक धर्मपंथ चालू झाला. धर्मसंबंधी बंडाचा इंग्लंदांत आतां अगदी वीमोड झाला आहे. राजाश्रित धर्मपंथांचे सर्व हक इतर सर्व धर्मपंथाच्या लोकांसहि देण्यांत आले आहेत.