पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०३) आरमारासंबंधी श्रेष्ठत्वाचा न्हास झाला, आणि इंग्लिश व डच ह्या लोकांनी प्रथम त्याची गलबतें लुटिली. नंतर ज्या प्रदेशावर स्पेन देशांतील लोक हक्क सांगत होते, त्या प्रदेशांत जाऊन वसाहती करण्यास त्यांनी प्रारंभ केला. शिवाय ह्या सुमारास स्पेन देशांतील लोकांनी पोर्तुगाल देश जिंकून घेाला होता; म्हणून पोर्तुगीज वसाहतींवरहि अशाच प्रकारचे हल्ले करण्यास अडथळा राहिला नाहीं. अशा रीतीनें मूळ शोध लावणाऱ्या राष्ट्रांचे नुकसान करून इंग्लेढ़ व हालंद हे देश त्या शोधांपासून आपला कायमचा फायदा करून घेण्याच्या उद्योगास लागले. ससाण्यानें धनगराच्या कळपांतील कोकरूं चोरावें; व पुढें सप्ताण्यापासून गरुडानें तें हिसकावून घ्यावें, त्याप्र- माणे ह्या दोन देशांचें वरील वर्तन झालें. इंग्लंदचा राजा पहिला जेम्स ह्याच्या मतांत स्पेन देशाशी सख्य करा- बयाचें होतें, व तसे केल्याने इंग्रज लोकांच्या व्यापारास धक्का बसण्याचा संभव होता. पुढे तो राजा इंग्रजांस अप्रिय होण्याचे कारण कांहीं अंशाने हेच होतें. अमेरिकेत स्थापिलेल्या वसाहती ३ प्रकारच्या होत्या. त्या खंडाचा शोध लावणारांचा पहिला उद्देश सांपडेल तितके सोनें मिळावे हा होता; म्हणून सोन्या- च्या खाणींचें काम चालविण्यासाठी त्यांनी प्रथम वसा- हती स्थापिल्या, त्या १ल्या प्रकारच्या होत. मेक्सिको ब पेरू ह्या स्पेन देशाच्या बसाहती अशा प्रकारच्या