Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०४) होत्या. उष्ण कटिबंधांत होणाऱ्या उसासारख्या पदार्थांची लागवड करून स्वदेशास त्या पदार्थांचा पुरवठा करणे हा त्यांचा दुसरा उद्देश होता; व अशा प्रकारच्या वसाहती २च्या प्रकारच्या होत. अमेरिकेतील वसाहती, वसाहत करणारांनी ह्या झाडांची पुष्कळ लागवड केली. ह्या कामीं त्यांनीं प्रथमतः त्या देशांतील नेटिव्हांस मञ्जुरीनें लाविलें; आणि जेव्हां तें काम त्यांच्या हातून होत नाहीं असे आढळून आले, तेव्हां आफ्रिका खंडांतून काम करण्यासाठी त्यांनीं शिद्दी लोकांस मुद्दाम नेलें. ह्या दुसऱ्या प्रकारच्या वसाहती म्हटल्या म्हणजे वेस्ट इंडीज बेरें ह्या होत. स्पेन व पोर्तुगाल ह्या देशांच्या वसाहतींचा समावेश ह्या २ या वर्गात होत असे. ३च्या एका प्रकारच्या वसाहती करण्यासारख्या होत्या, हे उघड आहे. त्या वसाहती अशा की, स्वदेशांतल्याप्रमाणेच आंग मेह- नतीनें तेथें शेतकीचा धंदा करावयाचा. स्पेन व पोर्तु- गाल ह्यांच्या अशा प्रकारच्या वसाहती नव्हत्या; परंतु इंग्लंदाच्या बहुतेक वसाहती ह्या ३च्या वर्गात मोडतात. १७ व्या शतकाच्या आरंभापर्यंत इंग्रज लोकांनी अमेरिका खंडांत कोठेंहि स्थाइक वस्ती केली नव्हती. परंतु लवकरच उत्तर अमेरिकेच्या पूर्वेस वऱ्याच अंतरा वर अतूलांतिक महासागरांतील बर्म्युदा नांवाची बेटे त्यांनी हस्तगत करून घेतलीं; व हाच इंग्लंदच्या