पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०२) रिका, आस्त्रेलिया, वगैरे प्रदेशांचा ) आपणांस कांहींच उपयोग होणार नाहीं, आणि स्पेन व पोर्तुगाल ह्या राष्ट्रांनी उदयास येण्याची जी संवी साधिली, ती आपण गमा- विल्याप्रमाणे होईल, असे इंग्लिश लोकांस वाटले. “दूध सांडून गेल्यावर त्यासाठी रडत बसण्यांत कांहीं अर्थ नाहीं, " अर्से त्या काळच्या इंग्लिश लोकांस घरों स्वस्थ बसून म्हणतां आलें असतें; अथवा अन्य रीतीनें आपलें समाधान करून घेतां आलें असतें; परंतु त्यांनी तसे कांहीं केलें नाहीं. त्या काळी स्पेन देशाशी त्यांचें फारसें सख्य नव्हते; म्हणून इंग्रजांच्या खलाशांनों जहाजें तयार केली, आणि स्पेन देशाच्या वसाहतींतून खजिन्याची गल- बतें भरून स्पेन देशास येत असतां, व्यापार करण्यास प्रतिबंध केल्यामुळे आपले जें नुकसान झाले होते ते इंग्र जांनी आपले आपणच भरून काढिलें! स्पेन देशच्या व्यापाराचें जें हें नुकसान झाले त्यामुळे तेथील राजा फिलिप ह्यास फार त्वेष आला; व पुढे लवकरच त्यानें 4 स्पॅनिश आरमाडा , ( स्पेन देशचीं लढाऊ गलबतें ) म्हणून जे मोठें आरमार इंग्लंदावर पाठविलें, त्याचें मुख्य कारण हेंच होय. ह्या आरमाराचा पराभव झाल्यामुळे फिलिपाच्या

" It was no use crying over spilt mi- lk, " ही मूळ इंग्रजी म्हण होय. 'गतं न शोच्यम्' ही संस्कृत म्हण ह्याच अर्थाची आहे. 6"