पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९९ ) त रस्ता शोधून काढिला. हे दोन्ही शोध अत्यन्त मह- त्त्वाचे होते. कारण प्राचीन काळापासून सुधारणेचें मुख्य स्थान जें भूमध्य समुद्र झाले होतें, तें ह्या शोधां- मुळे नाहींसे होऊन त्याच्या ऐवजी अतूलांतिक महासा- गर हें मुख्य स्थान झालें. शिवाय कोणत्याहि राष्ट्राच्या सत्तेचा अजमास ह्या वेळापर्यंत त्या राष्ट्राचें युरोप खंडां- जं महत्त्व असे त्यावरून करीत असत; परंतु ह्यापुढें सर्व जगांत त्या राष्ट्राचे महत्त्व ज्या प्रमाणानें असेल, त्या मानाने त्याचें युरोप खंडांत महत्त्व समजूं लागले. ज्याप्र- माणें वाबिलोनियाचे महत्त्व पूर्वी नाहींसें झालें होतें, त्याप्रमाणेच इताली देशांतील प्लारेन्स व वेनिस वगैरे लहान लहान लोकसत्ताक राज्यांचे महत्त्व आतां नाहीं- सें झालें. तसेंच ज्याप्रमाणें भूमध्य समुद्राच्या किनाऱ्या वरील ग्रीस व कार्थेज हे देश पूर्वी अत्यन्त प्रबळ झाले होते, त्याप्रमाणेच स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स व इंग्लंद हे अतलांतिक महासागराच्या किनाऱ्यावरील देश जगांत आतां फार बलिष्ठ झाले. अमेरिका खंड आणि हिंदुस्थानास येण्याचा जलमार्ग ह्या दोन शोधांपैकी एकहि शोध इंग्रजांच्या हातून लागलेला नाहीं, हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे. हे दोन शोध लाविल्याचें यश अनुक्रमें स्पेन व पोर्तुगाल ह्या देशांनीं घेतलें. म्हणून ह्या आपल्या शोधांचा उपयोग आपण पाहिजे त्या रीतीनें करून घेऊं,