पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९८) काळी वार्ताहि नव्हती असे म्हटले तरी चालेल. तसेंच आफ्रिका खंडांत उत्तरेकडे अबिसीनिया व पश्चिमेकडे मोरोक्को ह्यांच्या पलीकडे कोणाचाहि प्रवेश झाला नव्हता. ह्याहून अधिक लांबच्या प्रदेशांविषयींची [ अमेरिका खंडाची ] कल्पनाहि कोणाच्या मनांत आली नव्हती; कारण पृथ्वी सपाट आहे, असे लोक मानीत होते. म्हणून पृथ्वी वास्तविक गोलाकार असून आपल्या खाल- च्या आंगासहि वस्ती असणें साहजिक आहे, ही कल्पना त्यांस नव्हती. तसेंच ती वाटोळी आहे असे जेव्हां त्यांस पुढें आढळून आलें, तेव्हां देखील तिचा वास्तविक जेवढा आकार आहे, त्यापेक्षां ती पुष्कळ लहान आहे, असे ते लोक मानीत असत. म्हणून त्यांना जेवढा प्रदेश माहित होता तेवढीच पृथ्वी आहे, असे त्यांना वाटणें साहजिक होतें. तथापि १९व्या शतकाच्या अखेरीस, म्हणज ट्यूडर घराण्यांतील पहिला राजा ७वा हेन्री हा इंग्लं दांत राज्य करीत होता त्या वेळेच्या सुमारास, अशा दोन विलक्षण गोष्टी घडून आल्या की, त्यांमुळे भूगोलाविष- यींचा लोकांचा सर्व ग्रह बदलून गेला. १ली गोष्ट ही कीं, थेट पश्चिमेकडे जातां जातां ख्रिस्तोफर कोलंबस ह्यानें अमेरिका खंड शोधून कार्टिलें; व २री गोष्ट ही कीं, वास्को दी गामा ह्यानें केप आफ गुड होप ह्या भूशि- रास वळसा घालून हिंदुस्थानास जलमार्गाने जाण्याचा