पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१००) असा हक्क तीं राष्ट्र साहजिकच सांगू लागली. तथापि तीं राष्ट्र ह्या संबंधानें आपापसांतच भांडतील, अशी थोडीशी भीति होती. परंतु हें भय फार सुलभ उपायानें नाहींसें झालें. त्या काळीं युरोप खंडांतील लोकांची समजूत अशी होती कीं, नवीन शोधून काढिलेली बेटें व इतर प्रदेश, ह्यांजवर मालकी पोपाची [ ख्रिस्ती धर्माच्या मुख्य गुरू- ची ]. ज्या मूर्तिपूजक लोकांनी त्या प्रदेशांत प्रारंभी वसा- इस केली होती त्यांची त्या प्रदेशांवर कांहीं तरी सत्ता आहे, असें मानणें रीतीचेंच आहे, हा विचार क्षणभर देखील कोणाच्या लक्षांत आला नाहीं. पुढे आपल्या हक्कांचा निर्णय करण्यासाठी स्पेन देशांतील लोकांनीं व पोर्तुगीज लोकांनी जेव्हां पोपाला विनंति केली, तेव्हां त्याने ह्या प्रकरणाचा निकाल केला तो असा. त्या वेळच्या देवभोळे लोकांच्या मताप्रमाणें पृथ्वी सपाट आहे असें त्यानें ठरविलें, व नकाशा घेऊन ओझोर्स बेटांच्या पश्चिमेस एक दक्षिणोत्तर सरळ रेषा ओढिली; आणि ह्या रेषेच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश स्पेन देशाला व पूर्वेकडील सर्व प्रदेश पोर्तुगाल देशाला देऊन टाकिला. स्पेन देशानें लाविलेल्या शोधाचा- अमेरिका खंडाचा–फायदा स्पेनला मिळावा, व पोर्तुगाल देशानें लाविलेल्या शोधाचा - हिंदुस्थानच्या जलमार्गाचा- फायदा पोर्तुगालला मिळावा, असा पोपाचा उद्देश होता. ( प्रारंभी दिलेला नकाशा पहा. ) अर्थात् प्रत्येकाचें