पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९७) समुद्राच्या आसपास असलेल्या ह्या चार देशांपैकी रोमच लष्कर सर्वांत जास्त होतें, व व्यापार कमी होता; म्हणून कांहीं काळानें रोमन लोकांनी टायर, ग्रीस व कार्थेज हे देश जिंकून घेतले, व भूमध्य समुद्राचा सर्व किनारा आपल्या ताब्यांत आणिला. तसेंच ब्रिटन देश ह्या काळापर्यंत सुधारणेच्या टप्प्याच्या बाहेर होता, तो त्यां नीं जिंकून ब्रिटिश लोकांना सुधारणेच्या मर्यादेच्या आंत आणून सोडिलें, हा त्यांजवर रोमन लोकांनी मोठा उप- कार केला. घर होतें. कित्येक शतकें भूमध्य समुद्र हें सुधारणेचें माहेर जरी रोमन राष्ट्रावर एका बाजूने गाथ ( फ्रान्स ) व जर्मनी ह्यांनीं व दुसऱ्या बाजूने मुसलमान लोकांनीं स्वाऱ्या केल्या, तरी युरोपांतील राष्ट्र भूमध्य समुद्रालाच धरून होतीं. त्यांचा बहुतेक व्यापार भूमध्य समुद्रांतून व युरोप खंडाच्या उत्तरेकडील देशां- मधील लहान लहान समुद्रांतून चालत असे. ह्याशिवाय जो थोडा बहुत व्यापार राहिला, तो फक्त हिंदुस्थानाशीं चालत असे, व तो कारवानांच्या द्वारें चालत असे. हे कारवान हिंदुस्थानांतील जिन्नस भूमध्य समु द्राच्या किनाऱ्यापर्यंत आणून टाकीत; त्या जिनसांचा खप ज्या देशांत होत असे, त्या देशांत ते जलमार्गाने पाठविण्यांत येत. खुद्द हिंदुस्थानाविषयीं त्या लोकांस थोडीच माहिती असे. चीन देशाची त्या नंतर ९