पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९२)

सर्वत्र शांतता राखणे, हें एक कृत्य आहे. तसेंच ह्या शांततेचें महत्त्व ब्रिटिश राष्ट्रास ह्यापुढे कमी वाटेल, असाहि संभव नाही. त्यांच्या वसाहती व त्यांच्या ताव्यांतील इतर देश, ह्यांचा व खुद्द त्यांच्या देशाचा जो संबंध आहे, त्यापासून उभयतांचेंहि हितच होत आहे, व म्हणून हा संबंध जसजसा दृढतर होत जाईल, तस- तशी जगाच्या शांततेला धोका बसण्याची भीतिहि कमी कमी होत जाईल. कारण पृथ्वीवरील सर्व खंडांतून ज्यांचा मुलूख आहे, असे मोठें राष्ट्र क्षुल्लक कारणांवरून मोठ- मोठ्या युद्धांस तयार होण्याचा संभव नाहीं. लहानसान लढाया होतीलच; परंतु कालेकरून अशा लढायाहि क्वचि तू होत जातील, अशी आशा आहे. तसेंच, ब्रिटिश राष्ट्रांतील निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांची “इंग्लिश" ही एकच भाषा हळू हळू होत चालली असल्यामुळे त्यांचें ऐक्य होत चालले आहे, म्हणून जगांतील सर्व मनुष्य- जातीचें ऐक्य होण्याचा आणि सर्व जगाचें एक- राष्ट्र होण्याचा हा आरंभच होईल, अशी आशा आहे.

पूर्वार्ध समाप्त.