पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९१)

 शेवटीं थोडें लिहावयाचें आहे. ह्या दोन प्रकर णांतील व पुढील दोन प्रकरणांतील हकीगतीवरून ध्यानांत येईल कीं, ब्रिटिश राष्ट्राचा सांप्रत जो एवढा मोठा विस्तार झाला आहे, तो होण्यास इंग्लिशांना अनेक युद्धप्रसंग करावे लागले आहेत. आजमितीस देखील जगाच्या शांतते- वर ब्रिटिश राष्ट्राने होणारे परिणाम. सरहद्दीवर वारंवार लढाया होतात. तथापि ब्रिटिस राज्यसत्तेमुळे हल्लीं ब्रिटिश राष्ट्राएवढ्या अफाट प्रदेशांतहि युद्धप्रसंगाचें फारसें भय राहिले नाहीं; व अशा प्रकारचे उदाहरण जगाच्या इतिहासांत दुसरें एकहि सांपडावयाचें नाहीं, असें म्हणण्यास कांहीं शंका दिसत नाहीं. हिंदुस्थानांतील २८ कोटि प्रजेपैकी किती- जणांनीं लढाईमध्यें निघालेला बंदुकीचा आवाज ऐकिला असेल बरें? इंग्लंदावर शेवटची स्वारी झाल्यापासून आज- पर्यंत किती वर्षे लोटलीं बरें? कानड्यांत हल्लीं हमेषा लढाया होत आहेत काय? आत्रेलियांतील किंवा न्यूझी- लंद्रमधील युरोपियम लोकांत झालेल्या लडाईचा इतिहास कोठें सांपडेल? अर्थात् असे प्रकार सांप्रत घडत नाहीत, असेंच उत्तर द्यावें लागेल. स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इताली, आस्त्रिया व रशिया ह्या राष्ट्रांच्या संबंधाने असेच प्रश्न केले असतां जें उत्तर निघेल, त्याशीं ह्या वरील उत्तराची तुलना करा, म्हणजे खातरी होईल की, ब्रिटिश राष्ट्राने गेल्या कांही वर्षांत जी महत्त्वाची कृत्यें केलीं आहेत, त्यांपैकीच