पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९३)
प्रकरण तिसरें.

ब्रिटिश वसाहतींची पूर्वस्थिति कशी होती

व त्या त्यांनी कशा मिळविल्या.


 अशी एक आख्यायिका सांगतात की, एकदां इंग्लंदांतील कोणा एका मुत्सद्दयाला कलोनियल ( वसा- हतींसंबंधी ) स्टेट सेक्रेटरीचें काम पाह- ण्याचा एकाएकी प्रसंग आला. उपोद्घात. तेव्हां हे मुत्सद्दी आपल्या चिटणिसास म्हणाले, “नकाशा आणून ह्या वसाहती कोठकोठें आहेत, हें प्रथमतः आपण पाहि- ल्यास बरें होणार नाहीं काय ? " ही आख्यायिका सर्वथा खरी आहे की काय हे पाहण्याचें विशेष कारण नाहीं. तथापि इतकें मानण्यास हरकत नाहीं कीं, वसा- हतींसंबंधानें खुद्द इंग्लंदांतील मोठमोठ्या मुत्सद्दयांना सुद्धां इतकी कमी माहिती होती. आतां इंग्रज लोक हिंदु- स्थानांतील २८ कोटि प्रजेचे प्रत्यक्ष राज्यकर्ते आहेत; व पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र पसरलेल्या १ कोटि इंग्लिश लोकांच्या कल्याणाशी त्यांचा अप्रत्यक्ष रीतीनें निकट संबंध आहे. ह्या गोष्टी लक्षांत आणिल्या म्हणजे ज्या प्रदेशांसंबंधानें व त्यांतील लोकांच्या संबंधानें ब्रिटिश लोकांवर इतकी जबाबदारी आहे, त्यांच्याविषयीं त्यांचें फार अज्ञान आहे, असे म्हणावें लागतें.