पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९०)

जाऊं देगें, हे नीतिदृष्टयाहि इंग्लिशांना वाईट आहे, असें वर दाखविलेंच आहे. हें अयोग्य कृत्य करण्या- विषयीं जर कोणी मनुष्य एखाद्या इंग्लिश गृहस्थास सांगेल तर त्याचें तें. करणे विलक्षण धाडसाचें होईल. सारांश, हिंदुस्थान ताव्यांत राखणे त्यांच्या फायद्याचें असून त्यांचे कर्तव्यहि आहे. म्हणून त्यांनी हा देश ताब्यांत राखावा किंवा नाहीं, ह्या प्रश्नाला आतां एकच उत्तर राहिलें, हे उघड आहे. तसेंच जर त्यांनी हा देश कबज्यांत ठेवण्याचा निश्चय केला, तर त्यामुळे उप्तन्न होणारी संकटेहि सोसण्यास त्यांना तयार झालें पाहिजे. हिंदुस्थान ताव्यांत ठेवावयाचें असल्यास परराष्ट्रांसंबंधानें त्यांना उदासीन राहतां येणार नाहीं, असहि वर दाखविलें आहे. हा देश त्यांच्या ताब्यांत असल्यामुळे अफगाणिस्थान, ईजिप्त व हिंदुस्थानास ये- ण्याचा मार्ग, हीं तीन त्यांना अत्यन्त महत्त्वाची झालीं आहेत. अशा दृष्टीनें विचार केला असतां खुद्द इंग्लंदांतील उलाढाली त्यांना जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच परराष्ट्रांतील उलाढालीहि त्यांना महत्त्वाच्या आहेत, असे झाले. ह्या उलाढाली इंग्लंदांतील एकाच पक्षास, एकाच वर्गास, बडे लोकांस, सैन्यास, व्यापायांस किंवा मजुरदारांस मात्र महत्त्वाच्या आहेत असे नाहीं; तर सर्व प्रकारच्या व सर्व धंद्यांच्या इंग्लिश लोकांस सारख्या- व महत्त्वाच्या आहेत.