पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८३)

ग्रेट ब्रिटन व आयर्लंद, फ्रान्स, जर्मनी व इताली हे सर्व देश एकत्र केले असतां जो विस्तार होईल, त्याच्या दु- प्पट आकाराच्या देशांत हे असंख्य पाटबंधारे पसरले आहेत. ही सर्व कामें ज्या खात्याकडून होतात, त्याला पब्लिक वर्क खातें म्हणतात. सारांश, उत्तम रीतीच्या दळणवळणाचा फायदा, उत्तम रीतीनें आयुष्य घालवि- ण्यास लागणारी साधनें, आणि अर्वाचीन सुधारणेचीं साधनें, दर माणशीं३ – पेन्स खर्चानें २० कोटि लोकांस ह्या पब्लिंक वर्कस् खात्यामुळे मिळाली आहेत.” ('इंडि- यन रेलवेज ' हिंदुस्थानांतील रेलवे - पृष्ठ २०५ )

 हिंदुस्थानचा व्यापार ऊर्जितदशेस आणण्यास रेलवेचा किती उपयोग झाला आहे, हे दाखविण्यासाठीं मुंबईच्या व्यापारी लोकांच्या सभेनें ( चेंबर ऑफ कॉम- से ) जमविलेले कांहीं आंकडे येथें उतरून घेऊं. “इ. स. १८५२।५३ ह्या वर्षी रेलवे प्रथम सुरू झाली, व त्या वर्षी १०,०७,०८,६१० रुपयांचे व्यापाराचे जिन्नस ह्या देशांत आले; इ. स. १८७२।७३त जेव्हां ५,६७१ मैल रेलवे झाली, तेव्हां ३१,८७,५०,००० रुपयांचे आले; व इ. स. १८८२१८३ त जेव्हां १०, ३१७ मैल रेलवे झाली तेव्हां १२,०९,८६, ७०० रुपयांचे आले. तसेच गेल्या ३० वर्षांत हिंदुस्थानांत येणाऱ्या जिन- सांच्या किंमती हळू हळू उतरत आल्या आहेत; म्हणून