पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८१)

शेतांस पाणी मिळालें; व त्या एंजिनीयरांच्या ह्या सत्कृ- त्यामुळे गरीब व श्रीमान् ह्या दोघांसहि त्यांचे कापसाचें पीक निर्भयपणें प्राप्त झालें. ईजिप्तांतील लोक ह्या धरणास “ ब्रिज् ऑफ् ब्लेसिंग्ज् " ( सुखाचा पूल ) असें म्हणतात. हिंदुस्थानांत सिंधु व गंगा ह्या मोठाल्या नद्या व दुसऱ्या पुष्कळ लहान लहान नद्या अशाप्रका- रच्या धरणाच्या कामास फार उपयोगाच्या आहेत; मात्र हीं धरणे बांधण्यास खर्च लागणार आहे. तेव्हां शेतकीला कमी खर्च लागेसें करणें, व पडीत जमीन लाग- वडी खाली आणणें, ह्या गोष्टींस जरूर काय ती भांड- वलाची व श्रमाची आहे.

 दूसरे असे आहे कीं, हिंदुस्थानांत दळणवळ- णाच्या साधनांची फार उणीव आहे. अशा विस्तीर्ण देशांत जिकडे तिकडे दळणवळणाचे मार्ग खुले होण्यास किती तरी मैल रेलवे पाहिजे. ग्रेट ब्रिटन व आयर्लंद हिंदुस्थानांतील मिळून १८,००० मैल रेलवे आहे; आणि हिंदुस्थानचें क्षेत्रफळ ह्यांच्या ११ पट असतांहि येथें इ. स. १८८४त ११,००० मैलच रेलवे होती. तथापि रेलवे व पाटबंधारे ह्या उपयुक्त कामांक- डेच सरकारचें हल्लीं फार लक्ष आहे. इंग्लंदांत रेलवे, ट्राम वे व ह्यांसारखी दुसरी कामें लोकांनींच खाजगी रीतीनें आरंभिलीं आहेत. परंतु हिंदुस्थानांत जर हीं कामें सरकारनें केली नाहीत, तर ती कधीहि घडून