पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८०)

न्टीन्थ सेंचरी " ( १९ वे शतक) ह्या नांवाच्या मासिक पुस्तकांत कर्नल स्कॉट मानकीफ ह्यांनी दिलेलें उदाहरण येथें सांगतो.

 वीस वर्षांपूर्वी कायरो शहराच्या दक्षिणेच्या बाजूस १२ मैलांवर नैल नदी सखल आहे त्या ठिकाणीं पाणी अडवून धरण्यासाठीं एका फ्रेंच गृहस्थानें धरण बांधि- लें. त्याचा उद्देश असा की, असे धरण बांधिलं म्हणजे जमिनीवरून पाणी आपाप वाहत जाईल; व बंब लावून पाणी वर घेण्याची आवश्यकता राहणार नाहीं. हें धरण बांधिलें तरी त्याचा उपयोग झाला नाहीं; कारण गेल्या वर्षापर्यंत त्याचे सांडवे उघडे ठेविले होते; कां तर 'धरणाचें बांधकाम कच्चें असल्याबद्दल रिपोर्ट झाला होता. ह्यामुळे शेतकऱ्यांस बंबानें पाणी चढविण्यास अतिशय खर्च करावा लागे; नाहीं तर पाण्यावांचून रहावें लागून हातांतून पीक अजीबात घालवावे लागे. पुढे हिंदुस्था- नांतील कांहीं इंग्लिश एंजिनीयर ईजिप्त सरकारनें ह्या धरणाच्या बांधकामाच्या तपासणीसाठी नेमिले. तेव्हां त्यांना असे आढळून आलें कीं, बांधकाम जितकें कच्चे वाटत आहे तितकें कच्चे तें नाहीं. म्हणून नैल सखल होती, त्या प्रदेशाच्या नेहमींच्या सपाटीपेक्षां ७ फूट ३ इंच इतक्या उंचीवर पाणी राहील, अशा बेतानें त्यांनीं धरणाचीं द्वारें बंद केलीं. ह्यामुळे ह्या धरणाच्या वरच्या बाजूस कित्येक मैलांपर्यंत बंबाच्या खर्चावांचून